शिवीगाळ करत दिली ठार मारण्याची धमकी;आरोपींवर गुन्हा दाखल

। माणगाव । प्रतिनिधी ।
अश्‍लील शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना गुरुवारी (21 जुलै) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर मच्छी मार्केट माणगाव येथे घडली. या घटनेतील फिर्यादी रोहिणी नांदे, सचिन चंद्रकांत गोळे (वय-45), स्वाती राकेश कळमकर (वय-30) व आरोपी महेंद्र शंकर मोरे, सुरेश नथुराम शिगवण माणगाव तालुक्यातील होडगाव कोंड येथे राहतात. यातील मुंबई-गोवा महामार्गावरून माणगाव कोर्टाकडे चालत जात असताना मच्छी मार्केट येथे आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.

Exit mobile version