गोगावले दाम्पत्याविषयी अपमानास्पद संभाषण

| महाड | प्रतिनिधी |

आमदार भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नीबाबत शिव्या देणारे संभाषण संपूर्ण शहरात व्हायरल झाले. याबाबत सोमवारी महाड शहर पोलीस ठाण्यात आ. गोगावले यांच्या समर्थकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

गोगावले आणि जमीर फैरोजखान देशमुख यांच्यामध्ये फोनद्वारे झालेला संवाद जमीर याने चिथावणीच्या उद्देशाने चंद्रकांत धोंडगे यांना पाठवला. हे संभाषण चंद्रकांत धोंडगे यांनी महाड चर्चा मंच या व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल करून गोगावले आणि पत्नी सुषमा गोगावले यांना शिवीगाळ करून अपमानास्पद शब्द वापर केल्याने सिद्धेश शेखर मोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत धोंडगे बेबलघर, जमीर फैरोजखान देशमुख अप्पर तुडील, राज रघुवीर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस निरीक्षक श्री.खोपडे हे करीत आहेत.

Exit mobile version