एसीसी, अंबुजाचे कारखाने बंद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब संकटात सापडलं आहे. हिमाचल प्रदेशातील बर्माना येथील एसीसी सिमेंट आणि दरलाघाट येथील अंबुजा यांनी बुधवारी त्यांचे प्लांट बंद केले.

दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी आणि कामगारांना गुरुवारपासून कामावर न येण्याचे आदेश जारी केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी मागणी कमी असल्याचं कारण देत प्लांटला टाळं ठोकलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बर्माना येथील एसीसी प्लांटचे प्रमुख अमिताभ सिंह यांनी आदेश जारी करत परिस्थिती सुधारेपर्यंत व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांना कामावर परत न येण्यास सांगितलं आहे. तसेच कर्मचार्‍यांना पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे.

Exit mobile version