| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरपासून व्यावसायिक विमानांची सेवा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने विमानतळ परिसरातील रंगरंगोटी आणि रस्ते सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील भिंती, कम्पाउंड वॉल, फ्लायओव्हर खालील पॅनेल्स आणि रस्त्यालगतच्या संरचना नव्या डिसेंबरपासून व्यावसायिक विमानांची रंगसंगतीत नटविल्या जात आहेत. सिडकोने मुख्य कॉरिडॉरवर थीम-बेस्ड भित्तिचित्रे, कलात्मक पेंटिंग आणि स्वच्छ, एकसंध लूक देणाऱ्या रंगकामाची निवड केली आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या उलवेतील मुख्य मार्गावरील दुभाजक, पदपथ, दिशादर्शक फलक आणि पथदिव्यांच्या रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. रस्त्याच्या रेखांकन पट्टांचे नूतनीकरणही केले जात आहे.







