मागण्या मान्य करा, युद्ध थांबवतो; रशियाचा इशारा

| मॉस्को | वृत्तसंस्था |
रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली.

मोदी -पुतीन यांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे 50 मिनिटे चालला. त्यांनी युक्रेनमधील विकसित परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनियन आणि रशियन संघांमधील वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली.यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना थेट युक्रेनशी चर्चा करावी असा सल्ला दिला. टीमच्या माध्यमातून सुरु असणार्‍या वाटाघाटीच्या चर्चेच्या सत्रांबरोबरच थेट चर्चाही करावी असा सल्ला मोदींनी दिला, असं सुत्रांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणार्‍यांची संख्या सुमारे 15 लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे.

Exit mobile version