अलिबाग-स्वारगेट शिवशाहीला अपघात

सुदैवाने प्रवासी सुखरूप

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग-स्वारगेट या शिवशाही बसला बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील अंडा पॉईंटजवळ अपघात झाला. बसमध्ये यावेळी 44 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. घाटातील रस्त्यावर ऑईल पडले होते. त्यामुळे रस्त्यावरुन बस अचानक घसरली आणि उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहतूक पोलीस, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदरची बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Exit mobile version