| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण गाजत असतानाच आता कोल्हापूरमध्येही अशाच एका अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एक भीषण अपघात झाला असून भरधाव कारने चौघांना चिरडल्याची घटना घडली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सायबर चौकात एक भरधाव कार आली आणि तिने समोरच्या टूव्हीलर गाड्यांना धडक दिली. त्यामध्ये काही लोक हे हवेत उडाल्याचे दिसून आलं. हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर सायबर चौकात अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
