महाड येथे अपघात, 1 ठार

। अलिबाग । वार्ताहर ।
महाड येथे मुंबई-गोवा हायवेवर अपघात झाला असून या अपघातात एकजण ठार झाला आहे. मयत आरोपी रा.उमरठ, पोलादपूर याने हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.एम.एच.06बी.एक्स.0920 मुंबई-गोवा हायवेवर मोटारसायकल हयगयीने चालवून ईसाने कांबळे गावाच्या हददीत एस फुड पार्क समोर होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम एच 06 सी ई 7762 हिला ठोकर मारून व मुंबई बाजुकडुन येणारी ईनोव्हा कार क्र. एम एच 47 ए. बी 7377 ला धडकून अपघात केला. या अपघातात आरोपीत मयत झाला आहे. याबाबत महाड (एम.आय.डी.सी.) पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version