मांडवा जेट्टी उघडीवर अपघात; तरुणीचा मृत्यू, पाच जण जखमी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मांडवा जेट्टी उघडीवर शनिवारी (दि. 21) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाला असून मॅक्सीमो चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. वर्षा कुटे असे मयत झालेल्या तरुणीचे नाव असून ती 27 वर्षांची होती. मुंबईतून अलिबागला फिरण्यासाठी आलेले पर्यटक मांडवा येथून मॅक्सीमोमधून प्रवास करत होते. सदर मॅक्सीमो मांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या रहाटले येथील उघडी जवळ आली असताना चालकाचे नियंत्रण सुटून उघडी खाली विरुद्ध बाजूला जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की यात वर्षा कुटे रा.मुंबई (वय 27) या तरुणीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर चालक आणि चार प्रवासी असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी झालेल्यांना मुंबई येथे हलवत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजु पाटील यांनी दिली.

Exit mobile version