अनेक जण जखमी
। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिकच्या चांदवड राहुड घाटात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या वाहनाने समोरील वाहनांना धडक दिल्याने एकाचवेळी 5 ते 6 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 20 ते 21 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णावाहिका घटनास्थळी पोहचून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गांवर असलेल्या चांदवडच्या राहुड घाटात शुक्रवारी (दि. 21) रात्री 10 च्या सुमारास हा अपघात घडला. घाट उतरत असताना एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि पुढे जाणाऱ्या तीन ते चार कार, एक ट्रक तसेच, बसला धडक बसली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून उषा मोहन देवरे (45, रा. भारत नगर, मालेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, अपघातात 20 ते 21 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.