मुरूम माती टाकण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावर सातत्याने अपघात घडतात. त्या अपघातांना प्रामुख्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टी नसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ मुरूम मातीची साईडपट्टी टाकावी अशी मागणी विजय हजारे यांनी केली आहे.
माथेरान नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्याची रुंदी साडे लाच मिटर असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टी बनविण्यात आली नाही. मुरूम माती टाकून साईड पट्टी बनविण्यात आलेली नसल्याने या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे या रस्त्यावर अनेक वर्षे डांबरीकरण कामे करणार्या ठेकेदाराने साईड पट्टी टाकण्याचे बंधन असताना साईड पट्टी बनविली नाही. त्याचा फटका वाहन चालक यांना बसत असून वाहनचालक यांच्याकडून सातत्याने साईडपट्टी टाकण्याची मागणी केली जात असते. ते लक्षात घेवून आणि रस्त्याची रुंदी वाढण्यासाठी दोन्ही बाजूला साईडपट्टी महत्वाची असते. हे लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून या रस्त्यावर तत्काळ मुरूम मातीची साईडपट्टी टाकण्यात यावी अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केली आहे.
सतत होणारे अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने परवानगी दिल्यास आपण स्वखर्चाने मुरूम मातीची साईड पट्टी नेरळ कळंब रस्त्यावर टाकून देवू अशी भूमिका विजय हजारे यांनी मांडली आहे. नेरळ-कंळब राज्यमार्ग रस्त्याला नेरळ रेल्वे गेटाच्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक एक मीटर रुंदीचा आणि कमीत कमी 50 मिटर लांबीपर्यंत हार्ड मुरुमाची साईडपट्टि सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकावी. जेणेकरून नेरळ-कंळब राज्यमार्ग रस्त्याला नेरळ रेल्वे गेटजवळ साईडपट्टि केल्यास गेटजवळ होणारी ट्राँफिक थोड्याफार प्रमाणात कमी होईल. तसेच रेल्वे फाटकातून ये जा करणार्य़ा वाटसरू यांना व्यवस्थित रस्त्याच्या बाजुने चालता येईल. त्यासाठी जर सार्वजनिक बांधकाम विभागाला नेरळ-कंळब राज्यमार्ग रस्त्याला 50 मिटर साईडपट्टि करणे शक्य होत नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आपणास नेरळ-कंळब राज्यमार्ग रस्यालगत नेरळ रेल्वे गेटजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस 50 मीटर लांबीपर्यंत स्वखर्चाने साईडपट्टि करून देऊ असे आश्वासन दिले आहे.