धक्कादायक! अलिबाग शहरात अपघात; एकजण जागीच ठार


। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात बुधवारी सायंकाळी दुचाकीच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाला. रस्त्याच्या बाजूला उभा असताना महावीर चौकाकडून येणाऱ्या दुचाकीची त्यांना धडक लागली. ही घटना ब्राह्मण आळी येथे घडली.

घननिळ प्रधान ( वय 71 वर्षे ) असे या वयोवृद्ध मयत व्यक्तीचे नाव आहे.हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील असून सध्या अलिबाग तालुक्यातील झिराड येथे राहत होते. बुधवारी सायंकाळी ब्राह्मण आळीमधील मेडिकल मध्ये ते औषध घेण्यासाठी आले होते.औषध घेऊन झाल्यावर ते रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होते.मात्र वाहनांची वर्दळ असल्याने ते रस्त्याच्या कडेलाच उभे होते .दरम्यान महावीर चौकाकडून एक दुचाकी घेऊन चालक राज दरडिंगे राममंदिरकडे जात होता. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पादचारी घननिळ प्रधान यांना जोरदार धडक लागली. या धडकेत प्रधान गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले.याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Exit mobile version