। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भरधाव इर्टिका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून थेट शेतात शिरल्याची घटना मंगळवारी सायंकाळी अलिबाग तालुक्यातील खंडाळे परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अलिबाग-पेण राज्य मार्गावर सायंकाळी पेणहून इर्टिका कार अलिबागकडे चालली होती. खंडाळे परिसरात कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यावरून थेट शेतात कार घुसली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ग्रामस्थांच्या मदतीने उशिरा ही कार शेतातून काढण्यात आली.