। पेण । संतोष पाटील ।
पेण- खोपोली मार्गावर आंबेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एम.एच.06 सी.सी.2929 टाटा हरियर या काळया रंगाच्या चार चाकी वाहनाने पेणकडे येणार्या एम.एच.06 व्ही.8309 या दुचाकीला स्वताःची लेन सोडून जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये दुचाकीवर अनंत कृष्णा दिवेकर, वय 60, रा.करोटी हे जागीस गतप्राण झाले असून, त्यांच्या सख्खा भाऊ हरिभाऊ कृष्णा दिवेकर, वय 55 यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. परंतु त्यांची स्थिती देखील चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पेण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.