साळावमध्ये अपघात, तरुण जागीच ठार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वडखळ येथील जेएसडब्लू कंपनीत कामाला जात असताना बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक लागली. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून जेएसडब्लू कंपनीसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा शुक्रवारी (दि.28) सकाळी मिठेखार येथून दुचाकीवरून वडखळ येथील जेएसडब्लू कंपनीत कामावर जात होता. साळाव येथील कंपनीच्या कर्मचारी वसाहतीजवळ खैराव येथे आल्यावर बंद पडलेला एक ट्रक रस्त्यात उभा होता. त्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक लागली. या धडकेत गंभीर जखमी होऊन तरुण ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक व मिठेखार येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जमाव केला. त्यामुळे कित्येक तासापासून कंपनीसमोर तणावाचे वातावरण आहे.

Exit mobile version