| खरोशी | वार्ताहर |
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार विजय मोकल यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांना अपघात विमा कवच पॉलिसी काढून, तसेच मास्कचे वाटप करून अनोखी भेट दिली. यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव म्हणून काम करत असताना सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करणारे पत्रकार विजय मोकल यांनी मागील वर्षी दवणसर येथील गोशाळेत मदत केली होती. पत्रकारांना नेहमीच सहकार्य करून यावर्षी पत्रकारांसाठी अपघात विमा कवच एसबीआय पॉलिसी काढून चांगले कार्य केले. याबरोबरच कोरोना काळात जनतेला मदत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, गरीब गरजू मुलांचे पालकत्व अशा अनेक सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमास एल.के पाटील, सदानंद म्हात्रे, जीवन पाटील, एस.के. लांगी, गौतम मोरे, प्रशांत पाटील, भूषण कडू, हर्षल पितळे, दत्ता कांबळे, सुनील पाटील, पत्रकार प्रमोद मोकल, प्रकाश माळी, विनायक पाटील, धनाजी घरत, किरण बांधणकर, गणेश पाटील, प्रशांत पोतदार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.