पळस्पे फाट्याजवळ अपघात; कारचे नुकसान

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील पळस्पे फाटा येथे हायवा डंपर चालकाने रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून बेदारकारपणे एका मोटार कारला जोराची ठोकर दिली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोटारकारचे मोठे नुकसान झाले आहे.

डोंबिवली येथे राहणारे शरद अनंत भोसले हे आपल्या कुटंबियांसह रत्नागिरी ते डोंबिवली मोटार कारने जात असताना, जुना मुंबई-पुणे रोडवर दत्त स्नॅक्स समोर त्याच बाजुने जाणार्‍या हायवा डंपर चालकाने रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून हयगईने बेदारकारपणे चालवुन शरद भोसले यांच्या कारला जोराची ठोकर दिली. याघटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोटार कारचे मोठे नुकसान झाले आहे. याघटनेची नोंद पनवेल शहर पोलीस करण्यात आली आहे.

Exit mobile version