। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयांच्या कामामुळे खाजगी ट्रॅव्हल बसला वाकणजवळ अपघात झाला. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असुन मोठा अनर्थ टळला आहे.
सविस्तर वृत्त असे कि मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईकडे जाणारी खाजगी ट्रव्हल बस (एमएच-03-डीव्ही-7891) वाकणजवळ बाजू काढण्याच्या नादात साईड पट्टीवर आली असता निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयामुळे या बसची चारही चाके या साईड पट्टयात घुसली. ही बस रस्त्याच्या बाजूला असणार्या 15 ते 20 फूट खोल दरीत पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले.