| सुधागड/पाली | प्रतिनिधी |
पेण-खेमवाडी मार्गावर महागावजवळ सोमवारी विचित्र अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार जखमी झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळी साडेआठ वाजता सुटणारी खेमवाडी-पेण ही बस पेणकडे जात असतांना समोरून वळणावर एक मोटारसायकल आली. यावेळी एसटी चालक व मोटारसायकलस्वार एकमेकांना वाचवायला गेले आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली तर दुचाकीस्वार शिक्षक पाटील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडले. यामध्ये त्यांना दुखापत झाली. एसटीतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.
पेणमध्ये एसटीचा अपघात; मोटारसायकलस्वार जखमी
