| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावर शनिवारी दुपारी एसटी बस व कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारसह बसचे नुकसान झाले. सुदैवाने मोठा अपघात टळला. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पनवेलहून विना थांबा एसटी बस अलिबाग स्थानकाकडे निघाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील मेघा चित्रमंदिरजवळ आल्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कारचा आणि बसचा किरकोळ अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे नुकसान झाले. बससह कारमधील प्रवासी सुखरूप असून, त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.







