माणगाव-म्हसळा रस्त्यावर अपघात

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव-म्हसळा स्त्यावर नळेफोडी गावाजवळ कारची इंज्याय गाडीला धडक लागून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 1 जण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.25) दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

माणगाव पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी कि, आरोपी अक्षय प्रतापराव चरणकर रा. पुणे यांनी त्याच्या ताब्यातील होंडा कार (एमएच-14-केडब्ल्यू-1464) माणगाव बाजूकडे घेऊन जात असताना अतिवेगाने चालवून समोरून येणार्‍या इंज्याय (एमएच-04-जीइ-6452) या गाडीला समोरून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात अजहर आलम शेख (38) रा. म्हसळा यांच्या उजव्या पायाला व हाताला तसेच गालाला मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले आहे. या अपघाताच्या गुन्हयाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भजकर हे करीत आहेत.

Exit mobile version