मुंबई-गोवा हायवेवर अपघात; 1 ठार तर दुसरा जखमी

। दापोली । वार्ताहर ।
दि. 6 नोव्हेंबर रोजी देगाव कोंडवाडी, दापोली येथे राहणारे फिर्यादी हे दापोली ते दिवा मुंबई असा मोटार सायकल क्र.एमएच-04/एझेड/5968 ही वरून मुंबई-गोवा हायवेने डब्बलसीट प्रवास करीत असताना मुंबई-गोवा हायवे रोडवर गांधारपाले गावचे हद्दीत आले असताना मोटार सायकल वरील ताबा सुटल्याने मोटार सायकल रोडच्या बाजुला असलेल्या डिवायडरला लागुन घसरली व फिर्यादी यांना लहान मोठया स्वरूपाच्या जखमा होण्यास तसेच मयत यास लहान मोठया स्वरूपाच्या जखमा होवुन स्व:ताच्या मरणास कारणीभुत झाला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोह/1856 जागडे हे करीत आहेत.

Exit mobile version