मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दोघे जागीच ठार

। चिपळूण । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाला. टेंपोची कंटेनरला धडक लागून या अपघातात दोघे जागीच ठार झाले.

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथील पिकअप शेडजवळ गुरुवारी (दि. 08) सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोचालक ऋत्विक संतोष शिरोडकर (27) हा आपल्या मित्रसोबत टेम्पोतून मुंबईतून सिंधुदुर्गकडे जात होता. त्याचवेळी कामथे येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 22 चाकी कंटेनरला टेम्पोची मागून धडक लागली. ही धडक एवढी जोरदार होती कि यात टेंपोचालक ऋत्विक संतोष शिरोडकर आणि रामचंद्र ऊर्फ रामा राजेंद्र शेणई यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच, या अपघाताबाबत ऋत्विक शिरोडकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version