| गडब | वार्ताहर |
मुंबई -गोवा महामार्गावर जेएसडब्ल्यू कंपनीच्या गोवा गेटसमोरील ब्रिजवर पेणकडून नागोठणेकडे जाणाऱ्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिस्कर टँकरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलस्वार महेश जाधव राहाणार पन्हळघर माणगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर सुजाता जाधव या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वडखळ पोलीस करीत आहेत.







