दोघे जागीच ठार ; आयसर टेम्पोने दिली अज्ञात वाहनाला धडक
| खोपोली | प्रतिनीधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील चालक आणि क्लिनर जागीच ठार झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे आयसर टेम्पो माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात टेम्पोमधील चालक अनिल लाखंन गावित (27), रा. सिलवास दादर हवेली, अनिकेत राजू बोरसा सिल्ववा (24) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.