मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पाच ठार, ४२ पेक्षा जास्त जखमी

खाजगी बस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली

रायगड | खास प्रतिनिधी |

मुंबई– पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. खाजगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. ही घटना रात्री उशिरा वाजण्याच्या सुमारास घडला. गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम, होसाबाई पाटील तसेच ट्रॅक्टरमधील दोन पुरुष यांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांची ओळख पटलेली नाहीअशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सात गंभीर जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अन्य ४२ जखमींना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवलीमधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कलंडली, यात बसमधले प्रवाशी जखमी झाले. यात तीन भाविक जागीच ठार झाले तसेच दोन ट्रॅक्टर मधले प्रवाशी मृत पावले. तर बस मधले सात प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत , तर ४२ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.


Exit mobile version