| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई – पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज एका अल्टो कारने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुबंई – पुणे द्रुतगती मार्गावरून अल्टो कार ही कार चालक वसंत सदाशिव सैद रा. जुईनगर नवी मुबंई हे पुण्यावरून मुबंईकडे घेऊन जात असताना ते बोरघाटात ढेकू गावाजवळ आले असता, त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तिसऱ्या लेनमध्ये जाऊन समोर चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील कल्पना सावंत सैद(57), कविता शिंगोटे (60), वसंत शिंगोटे (62), लक्ष्मण शिंगोटे (60) रा. सर्व जुईनगर नर्मदा सोसायटी नवी मुबंई येथील असून हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तात्काळ कारमधून बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; चार जण गंभीर जखमी
