| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड आगरदांडा रस्तावर दोन मोटार सायकलाचा समोरा समोर येऊन जोरदार धडक लागल्याने त्यामध्ये दोघेजण मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला असून त्यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
सुदर्शन लक्ष्मण चिपोलकर राहणार मेंदडी म्हसळा व त्याचा मित्रा प्रमोद जगदीश पाटील मेहदंडी- म्हसळा हे दोघेजण आपली मोटारसायकल पल्सर मोटारसायकल वरून मेंदडीकडे जात असताना त्यात दरम्यान मुरुड खामदे शाळा शिक्षक – अविनाश पाईकराव हे आपल्या मोटार सायकल युनिकाॅन या गाडीवरून मुरुडकडे जात असताना आगरदांडा येथील रस्तावर समोर समोर येऊन जोरदार धडक लागल्याने त्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले.
धडक ऐवढी जोरदार होती की दोन्ही चालकांच्या तोंडाला, डोक्याला मोठ्या जखमा झाल्याने रस्तावर रक्तच रक्त पसरलेले होते व एकजण किरकोळ जखमी अवस्थेत येणाऱ्या नागरिकांनी पाहिले. घटना स्थळी थांबुन आगरदांडा येथील खोत यांनी ॲम्ब्युलन्स त्वरित बोलवली व लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर -सौरभ घरडे व डॉक्टर- वेदांती पाटील जखमींचा तपासणी केली. गंभीर दुखापत असल्याने जखमीना पुढील उपचारासाठी त्याच ॲम्ब्युलन्स मधून तिघांना अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आपघाताची बातमी कळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई घटनास्थळी येऊन पुढील तपास करीत आहेत.