पाली-विक्रमगड मार्गावर अपघात; दोन ठार

पिकअप, दुचाकीची समोरासमोर धडक

। पाली । वार्ताहर ।

पाली-विक्रमगड मार्गावर शनिवारी (दि. 07) सकाळच्या सुमारास पिकअप, दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

पाली-विक्रमगड मार्गावरील वाकडूपाडाजवळील वाकणाजवळ पालीकडून विक्रमगडकडे जाणारी दुचाकी, तर विक्रमगडकडून पालीकडे जाणारा पिकअप यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात सकाळी 9.30 च्या सुमारास झाला असून या भीषण अपघातात दुचाकीवरील स्वप्नील विजय भंडारी (22) रा.थेरोंडा याचा जागीच मृत्यू झाला. तर, संदेश लहानु मागी (23) रा.सारशी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version