पेझारी-नागोठणे मार्गावर अपघात

। अलिबाग । प्रतिनिधी ।
पेझारी-नागोठणे मार्गावर हेमनगरजवळ मोटारसायकलला वाचविताना मारुती सुझुकी इर्टिका कारचा अपघात झाला. सुदैवाने जिवितहानी नाही झाली. पेझारी-नागोठणे मार्गावरून राजेंद्र अमरनाथ ठाकूर हे आपली मारूती सुझुकी इर्टिका कार घेऊन जात असताना अचानक मोटारसायकलस्वार समोर आला. त्याला वाचविताना कारवरील ताबा सुटून ही कार खड्ड्यात गेली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र इर्टिका कार क्र.एमएच 06 सीडी 1618 या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Exit mobile version