। पनवेल । वार्ताहर ।
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरुन टँकर खाली पडून भीषण अपघात झाला. वीस ते पंचवीस फूट खाली टँकर पडल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नेवाळी टेंभोडेकडे जाणार्या ब्रिजजवळ घडली आहे. टँकर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एमएच 05 एएम 1278 वरील चालक अरविंद यादव (वय 42 वर्ष, राहणार हाजी मलंग रोड कल्याण) हा आपल्या ताब्यातील टँकर भरधाव वेगाने चालवित असल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. हा टँकर 20 ते 25 फूट खाली कोसळून पलटी झाला. यात टँकर चालक अरविंद यादव यांचा जागीच मृत्यू झाला. या टँकरमध्ये रसायन भरलेले होते. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; ड्रायव्हरचा जागीच मृत्यू
