। मुंबई । प्रतिनिधी ।
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि. 23) सकाळच्या सुमारास मेहकरजवळ भरधाव आर्टिगा कठड्यावर धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
ठाणे येथील एका शोरूममध्ये काम करणारे पाच जण ठाणे येथून नवी आर्टिगा (क्र. एम.एच.4 एम.एच.8808) ने बिहारला जात होते. दरम्यान चॅनल क्रमांक 299 वर मेहकरजवळ आले असता सीता न्हाणी नदीवरील कठड्यावर चालकाला झोप आली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार कठड्यावर धडकली. या अपघातात बिहारमधील विकासकुमार (32, रा. ओरमा) आणि गुड्डू कुमार (35, रा. मोतीहारी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. जखमींवर मेहकर येथील सहयोग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नीतीशकुमार (रा. महुवारी), मनिष कुमार (रा. ओश्वा) आणि प्रदीप सुरेश चव्हाण (रा. ठाणे) अशी जखमींची नावे आहेत.