समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेचा मृत्यू

| वैजापूर | प्रतिनिधी |

महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि.16) समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटला. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात एक महिला ठार झाली तर पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह आसरा फाउंडेशनच्या सेवकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील काही जखमींना तातडीने उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Exit mobile version