एक्स्प्रेस वे वर अपघातात एक ठार

| खोपोली | वार्ताहर |

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीनजिक आयशर टेम्पोने ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक जागीच ठार झाला. टेम्पा मुंबईकडे माल घेऊन निघाला होता. बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ आला असता उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक अंकुश माने, रा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्गावरील क्रेन ऑपरेटर, बोरघाट पोलीस, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, आपदा मित्र, आणि अपघात ग्रस्थांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी टेम्पो मधील अडकलेल्या चालकाला बाहेर काढला.

Exit mobile version