। अलिबाग । वार्ताहर ।
अपघातांच्या सुरू असलेल्या मालिकेत दिवसेंदिवस अपघातांचा आकडा वाढतच चालला आहे. शुक्रवारी दुपारी कार्लेखिंड-अलिबाग मार्गावर टेम्पो उलटून अपघात झाला आहे. कार्लेखिंडीकडून अलिबागकडे येत असताना टेम्पोचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटून हा अपघात झाला आहे. या अपघातातील टेम्पोचा नंबर एमएच 06 बीडब्ल्यू 2512 असून टेम्पो चालकाला कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नसल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिली आहे. तसेच टेम्पोतील सामान दुसर्या गाडीत हलवून टेम्पो चालक अलिबागच्या दिशेने गेल्याची माहितीही त्यांनी दिली.
अलिबाग येथे टेम्पो उलटून अपघात; चालक बालबाल बचावला
