सिमेंट बल्करला अपघात

| पनवेल | वार्ताहर |

सिमेंट बल्करचा अपघात घडल्याची घटना शुक्रवारी (दि.23) घडली आहे. घडलेल्या घटनेनुसार नावडेकडून पनवेलच्या दिशेने जाणारा सिमेंट बल्कर नावडे जवळील उड्डाणपूलाच्या कठड्यावर रात्री साडेनऊच्या दरम्यान धडकला. या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले आहे.

तळोजाकडून पनवेलच्या दिशेने जाणारा सिमेंट बल्कर क्रमांक एम एच 43 बीएक्स 9086 जात होता. यावेळी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंट बल्कर नावडे येथील उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढला. त्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने हा सिमेंट बल्कर कठड्यावरच राहिला. जर तो खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात चालकाने वेळीच उडी मारल्याने तो बचावला आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. या अपघातात सिमेंट बल्करचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version