नागलोली येथे एसटीला अपघात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे दुचाकीला वाचविताना एसटीला अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवासी नसल्याने साईडपट्टीला एसटी उतरली असता कोणतेच नुकसान झाले नाही. मात्र, येथील अरूंद रस्त्यामुळे अपघात घडल्याचे कारण समोर येत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरीजवळील म्हसळा-धनगरमलई मार्गावर नागलोली मधलीवाडीच्या पुढे येताना एसटीचा तीव्र उतारावर दुचाकी वाचविण्यासाठी एसटी रस्त्याच्या कडेला उतरण्यात आली. यावेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. प्रसंगी एसटीत एकच प्रवासी होता. त्यामुळे या अपघातात कोणतेच नुकसान झाले नाही.

दिघी ते बोर्लीपंचतन दांडगुरीमार्गे कसारकोंड ते श्रीवर्धन येथे जाणारी एमएच 20 बीएल 2474 चे चालक प्रवीण बेरगल होते. सकाळी 12 वाजून 15 मिनिटांनी दिघीहून ही एसटी निघाली असताना नागलोली गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा ब्रेक जागीच लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर प्रसंगावधान राखून त्याने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या बाजूला उतरवली. त्यामुळे दुचाकीस्वराचा जीव वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

अरुंद रस्त्यामुळे अपघात
ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागात अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे येथील प्रवास धोकादायक ठरत आहे.

खड्डेमय रस्ता, शिवाय दोन वाहने पास होऊ शकत नसलेला रस्ता. त्यामुळे दुचाकी वाचवायला जागा मिळाली नाही. एसटी खाली उतरली म्हणून आम्ही वाचलो.

संतोष मोडसिंग, दुचाकीस्वार
Exit mobile version