24 वर्षीय ऑलिम्पिक सायकलपटूचा आकस्मिक मृत्यू

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
न्यूझीलंडची ऑलिम्पिक सायकपटू ऑलिव्हिया पोडमोअरचा मृत्यू झाला आहे. ऑलिव्हिया अवघ्या 24 वर्षांची होती. यासंदर्भातील माहिती न्यूझीलंडच्या ऑलिम्पिक समितीने दिल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकबरोबरच ऑलिव्हियाने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं. मात्र, नुकत्याच टोकियोमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तिची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये संघाचा भाग नव्हती. तिच्या आकस्मिक मृत्यूने न्यूझीलंडमधील क्रीडा जगत हळहळलं व्यक्त केली आहे.

Exit mobile version