आमदार सरनाईकांच्या कुटुंबियांचा अपघाती मुत्यू

| अकोला | वृत्तसंस्था |

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

मृतांमध्ये या लोकांचा समावेश
वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडली आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (२८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले ( ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे ( ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.
Exit mobile version