पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडलेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती पोलीस दलात कार्यरत होते. सूरज रामचंद्र चौगुले (55) असे त्यांचे नाव आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.

यातील एर्टीगा कारवरील चालक सूरज रामचंद्र चौगुले, पोलीस उपनिरीक्षक, पार्क साईट पोलीस ठाणे, मुंबई हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवीत घेऊन जात होते. किमी 5.100 येथे आले असता त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात धडकून रेलिंगमध्ये अडकून अपघात झाला. या अपघातात चालक यांना छातीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आयआरबी अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे खासगी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन आयआरबी क्रेनच्या सहाय्याने शोल्डर लेनवर घेण्यात आले असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलीस व पळस्पे मोबाईलवरील स्टाफ व आयआरबी स्टाफ, देवदूत टीम तसेच तळोजा पोलीस ठाणे-नाईट राऊंड पनवेल विभाग, सपोनि पिसाळ खांदेश्‍वर पोलीस ठाणे, मसपोनि – सुषमा पाटील पनवेल शहर पो. ठाणे, सपोनि/खैरनार पनवेल शहर पो. ठाणे तसेच तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे स्टाफ, पनवेल तालुका पोलीस ठाणे स्टाफ, खान्देश्‍वर पोलीस ठाणे स्टाफ हजर होते.

Exit mobile version