| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात धीरज संतोष म्हात्रे या 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे उरण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास बामर लॉरीजवळ मोटारसायकलस्वार धीरज म्हात्रे या तरुणाच्या गाडीला अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.