शहाबाजनजिक अपघात; सहा जण जखमी

| भाकरवड | वार्ताहर |

शहाबाजनजिक डम्पर आणि क्वालिस यांची धडक होऊन सहाजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि.18) संध्याकाळी एका चायनिज सेंटरसमोर घडला. जखमी सर्वजण क्वालिसमधून प्रवास करीत होते. ते सर्व गेलचे कर्मचारी आहेत. यामध्ये राजेश मंडल, गणेश भोईर, मोनीरुख काझी, कुशल चक्रवर्ती, माणिकचंद शेख, अबु सिद्धकी अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जेएसडब्लूच्य संजिवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद पोयनाड पोलिसात करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव, सुभाष सोनावणे, राज म्हात्रे आदी करीत आहेत.

Exit mobile version