। हरियाणा । वृत्तसंस्था ।
हरियाणातील कैथलमध्ये दसऱ्याच्या दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जत्रेला जात असताना कार कालव्यात कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे तर, एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि चार महिलांचा समावेश आहे. तर, कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हरियाणातील कैथल येथे जत्रेसाठी एक कुटुंब कारने जात होते. गाडीत नऊ जण प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार मुंदरीजवळ एका कालव्यात कोसळली. स्थानिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. यात चालकाला वाचवण्यात यश आले आहे. गाडीतील इतर आठ जणांपैकी 7 जणांचे मृतदेह सापडले आहेत तर, 12 वर्षीय चिमुकली बेपत्ता असून सध्या तिचा शोध घेतला जात आहे.






