| रसायनी | वार्ताहर |
कष्टकरीनगर रसायनी येथील एका 22 वर्षीय तरूणाने लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी रसायनी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 मे रोजी कष्टकरी नगर येथील चंद्रकांत भरत कोकणे याकडे 29 इंच लांबीची व 2 इंच रूंदीची टोकदार व धारदार मोठी वायर गुंडाळलेली व त्यावर कागदी चिकटपट्टी लावलेली लोखंडी गंजलेली तलवार आढळली. याबाबत पोलीस सौरभ पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून, चंद्रकांत कोकणे याने परिसरात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने लोखंडी तलवार विना परवाना गैरकायदा घेऊन बाळगल्याबद्दल भारतीय हत्यार कलम 1959 चे कलम 4/25 नुसार आरोपी चंद्रकांत भरत कोकणे (रा. कष्टकरी नगर) यास अटक केली आहे. याबाबत अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे पोनि अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पोना पाटील तसेच दाखल अंमलदार पोलिस नाईक भोईर हे करीत आहेत.