बोगस लसीकरण प्रकरणात आरोपीला अटक

। बारामती । वृत्तसंस्था ।
मुंबईत बोगस लसीकरण करणार्‍या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे या आरोपीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण केलं जातं होतं. याबरोबरच हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरुन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.

Exit mobile version