। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास करताना नेरळ पोलिसांनी आरोपीला पकडले असून अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले आहे. तब्बल आठ मोबाईल त्या महिलेकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
नेरळ पोलीस स्टेशन परिसरातून विविध भागातून आठ मोबाईला चोरी गेले होते. यामध्ये विवो, संसग, अँपल, एमआय या कंपनीचे मोबाईल चोरी गेले होते. याबाबत मोबाइलमलाकांनी तक्रार दाखल केली. यानंतर नेरळ पोलीस स्टेशन यांनी मोबाईल नेरळ पोलीस ठाणे मोबाईल मिशन 2025 हे राबवण्यात आले. या मिशनद्वारे राजेस्थान, पुणे, मुबंई, या ठिकाणावरून हे मोबाईल जप्त करण्यात आले. नंतर हे मोबाईल नेरळ पोलीस स्टेशन येथे आणून हे मोबाईल जमा केल्यानंतर जा लोकांचे मोबाईल हरवले होते, त्यांना ते परत देण्यात आले.







