सलमान खान गोळीबार प्रकरण
| मुंबई | प्रतिनिधी |
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या आहे. गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले.
सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. तर, या आरोपींना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पंजाबमधून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली,
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने 25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू हा शेती करतो, आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने आज तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.