बांगलादेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक


| पनवेल | वार्ताहर |

बांगलादेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केले असून गेल्या दोन महिन्यापासूनची पनवेल शहर पोलिसांची दुहेरी कामगिरी आहे.

पनवेल जवळील करंजाडे सेक्टर आर.01 येथे राहणारा अमीनुर रसूल शेख (41), इबाद अमीनुर शेख (21) व महिला नामे कोहिनुर अमीनुर शेख (36) यांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ते बांगलादेशी घुसखोर असल्याबाबत खात्री पटल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यासंदर्भात आरोपींनी आपण बांग्लादेशी आहोत असे सांगून त्यांना रुबेल अनुमिया शिकदेर (29) याने भारतात येण्याकरिता मदत केल्याची माहिती दिली. त्यानुससार गुप्त बातमीदार च्या आधारे सदर आरोपीला अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले व त्याची अधिक चौकशी केली असता त्याने बांगलादेश येथे खुनाच्या गुन्ह्याखाली आरोपी असल्याचे सांगून तो गेल्या एक वर्षा पासून गुजरात येथे वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले. मागील महिन्यात सुद्धा अश्याच प्रकारे खुनाच्या गुन्हयात असलेले आरोपी अली हफीज शेख (27) व रबीवल मनन शेख (46) यांना सुद्धा अश्याच प्रकारे ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कामगिरी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (प्रशासन) प्रवीण भगत, सपोनि प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे, विनोद लभडे, अविनाश गंथडे, महेश पाटील, अमोल पाटील, अशोक राठोड, मिथुन भोसले, विशाल दुधे व कोकणी यांनी केले आहे.

Exit mobile version