चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील बोर्ले गावात संतापजनक घटना घडली असून येथील अपहरण केलेल्या दोन वर्ष तीन महिन्याचा बालक रुद्र अरुण यादव याच्या हत्येप्रकरणी आरोपीला माणगाव न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुद्र अरुण यादव याचे आरोपी संतोष अशोक यादव याने अपहरण करुन त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.माणगाव पोलिसांनी आरोपीला गुजरातमधील सिलवांसामध्ये सापळा रचून अटक केली.त्याने आपणच हत्या केल्याचे मान्य केले.दरम्यान, रुद्र याचा मृतदेह पाहून आई – वडिलांनी टाहो फोडला. आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशा शब्दात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला. घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर हे करीत आहेत.

Exit mobile version