फेक कॉल सेंटर प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी


| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग पोलिसांनी गुरुवारी नेचर एज रिसॉटमधील बेकायदा कॉल सेंटरवर धाड टाकून तब्बल 35 जणांना अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यालायलासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अलिबाग पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

शुक्रवारी अटक केल्यानंतर त्याच रात्री सर्व आरोपींची रात्री उशिरापर्यंत जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पार पडली. त्यांना मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी अलिबाग पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये शेकडोच्या संख्येन आरोपीच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबख यांच्यासह अन्य अधिकारी हे आरोपींची चौकशी करत होते. त्यानंतर त्यांना सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Exit mobile version